Tuesday, October 11, 2016


Dev.


मी कुणालातरी देव मानले,
म्हणून 'देव' माझ्यावर रूसला हाेता,
त्याला न मानता, मी सुखी हाेताे,
कदाचित हाच त्याचा मसला हाेता.

मी कुणाच्यातरी पाया पडताे,
हे त्याला बाेचत हाेतं,
की त्याची आठवण मी क्वचित काढताे,
हे त्याला खुपत हाेतं.

शेवटी त्याने सुड माझा घेतलाच,
माझ्या स्वप्नांवर घाव त्याने घातलाच.

मी खूप दुःखी व्हावे, आणि पुन्हा त्याच्या शरणी जावे,
अशी कारे त्याची ईच्छा हाेती,
की मी चुकिच्या व्यक्तिला देव मानले, हे सिद्ध करणे फक्त त्याची मनीशा हाेती.


मी इतका दुःखी झालाे,
की देवावरचा विश्वास उठला,
कदाचित हेच देवाला सांगायचं हाेतं,
देव तुझ्यातच तर तू का बाहेर शाेधताेस दुसरा कुठला....

No comments: