Ashach kahitari...
केवढा आनंद वाहतोय सगळीकडून,
हा सगळा मला गोळा करू दे,
इतक्या या सुंदर क्षणांना,
माझ्यात सामावून घेऊ दे...
किती सुंदर निर्मितीये निसर्गाची..हा आनंद,
दुसऱ्याचे दुःख कमी केल्याचा आनंद,
स्वतःच्या सुखात सहभागी केल्याचा आनंद,
आपले दुःख सांगून, दुसऱ्याला आपल्याला मदत केल्याचा आनंद...
अश्या या सुंदर सृष्टीत, तरीपण दुःखं तयार होतात,
कदाचित हे दुःख नसते,
आनंदांना रेस्पेक्ट न दिल्याने, रुसलेल्या आनंदाची पोकळी असते...
या आनंदांना रेस्पेक्ट न दिल्याने, आपण आपल्या जवळच्यांना पण या पोकळीत ओढून घेतो,
आणि या पोकळीत त्यांचापण जीव,
गुदमरून टाकतो...
म्हणून आनंदाला रेस्पेक्ट देणं फार महत्वाचंय,
आणि रुसलेल्या आनंदाला लवकर मनवणं
पण गरजेचंय...
मला खूप आनंद होतो,
जेव्हा दुसऱ्याच्या या रुसलेल्या आनंदाला मी मनवतो,
कसंतरी आनंदाला परत यायला,
मी पटवतो...
माझी इच्छा एवढीच,
माझ्याकडून कुणाचा आनंद ना कधी रुसू दे,
पण कधी अति रागात/दुःखात जर रुसवलोच,
तर तो त्यांना लवकर परत मिळू दे...

No comments:
Post a Comment