Tuesday, November 12, 2019

स्वप्ननगरी

स्वप्ननगरी

स्वप्न सत्यात आणायला आलो मी स्वप्ननगरित ,
खरच ही स्वप्ननगरी, कुणाची साकरलेली तर कुणाची भस्मित...

इथे सगळीकडेच झगमगाट आहे खूप ,
या झगमगाटात दडून गेलेलं माणसाचं कोवळं रूप ...

एकीकडे  श्रीमंतीच्या / पैश्यांच्या झोतांत दिपून गेलेलं खऱ्या /खोट्याचं स्वरूप
अन दुसरीकडे दारिद्र्यता , तर कुठे स्वभाव बनलेले विकृप ...

स्वप्नांच्या पाठीमागे धावत कुणा दुसऱ्याच्या स्वप्नांना साकार करतो,
तर कधी काळानुसार स्वप्ने बदलत, मूळ स्वप्न हरवून बसतो..

पण जिथे प्रयन्तांची पराकाष्टा , स्वप्नांवर नजर अढळ असते ,
त्याला हि मुंबादेवी प्रसन्न , आणि  हवा तो वर देते... 

Thursday, March 2, 2017

रावण

रावण एक इच्छाशक्ती,
रावण एक ध्यास,
रावण एक शूर हस्ती,
पण रावण म्हणजे विनाश...


रावण एक योद्धा,
रावण एक परम भक्त,
पण रावण एक अहंकार,
आणि रावण म्हणजे अंत...

जुन्या कविता

मला माहितीये तू माझ्या जवळ असणं,
हा माझा भास आहे,
पण ते हि मी स्वतःला सांगायला घाबरतो,
कारण तोच त्याचा श्वास आहे...
Saans lena mushil ho jata hai,
Jab aap lena chahate ho lekin
 Lene ke liye hawa nahi,
Par utana nahi,
Jab hawa bahot hai
Par aapake pass lene ki vajaha nahi....

School get together

आज काही क्षणात,
माझं शाळेतलं आयुष्यं, मी पुन्हा जगून बघितलं,
निजलेल्या आठवणींना,
मी पुन्हा जागवून बघितलं...

वाटलं कि, आकाशात उडणारी विमाने,
आज पुन्हा त्या इंजिनिर कडे आली,
जुन्या पार्टस ची सर्विसिन्ग,
तर काही नाविन सेन्सर्स मिळाली...

अजूनही नात्यात,
तीचकीच निरागसताय,
कदाचित तेव्हा देऊ शकलो नाही,
त्यातून वाढलेली आत्मीयताय...

या बदलत्या जगात,
हे नात खूप अनमोल आहे,
आणि सर्वांनीच मनाच्या शिंपल्यात,
त्याला तितकंच जपलेलं आहे...

ज्या भावनांना उजाळा मिळाल्या,
त्या आपण सतत पेटवत ठेऊ,
मला खात्रीये त्या प्रकाशाने,
भविष्याला एक दिवस चमकवून देऊ...

इस मतलबी दुनीयामें,
किसी पे विश्वास करने से डर लग रहा..
माली जब पानी डाले, कही ये तोड ना दे,
इस डर से फुल खिलनेसे कतारा रहा...

जुन्या कविता

मी आहेच जरास्सा वेगळा,
भूतकाळातील आठवणीत जगणारा,
वर्तमान काळात असूनही,
भविष्यात वावरणारा..

मी आहेच जरास्सा वेगळा,
सगळं माहिती असूनही,
काहीच माहिती नाही अस दाखवणारा,
वास्तव जीवनात असूनही,
कल्पनात रमणारा...